Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ, जाणून घ्या आज 1 लिटर इंधन किती रुपयांना मिळतंय?
Photo Credit - PTI

तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. आज 2 एप्रिल रोजी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याआधी शुक्रवारी दिलासा मिळाला असून दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, मात्र आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 117.57 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 101.70 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे.  त्यामुळे एक लिटर पेट्रोलची किंमत आता 102.61 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 93.87 प्रतिलीटरवर पोहोचला आहे. तर दिल्लीत पेट्रोलचे दर 80 पैशांनी महागले आहेत, तर दिल्लीत डिझेलच्या दरातही 80 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत आता एक लिटर पेट्रोलचा दर 102.61 रुपये आणि डिझेलचा दर 93.87 रुपये झाला आहे.

चेन्नईत पेट्रोलच्या दरात 76 पैशांनी वाढ झाली असून आता ते 108.21 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 98.28 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 84 पैशांनी तर डिझेल 80 पैशांनी वाढले आहे. यानंतर येथे एक लिटर पेट्रोल 112.19 रुपये आणि डिझेल 97.02 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. बंगळुरूमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ₹108.14 आणि एक लिटर डिझेलची किंमत ₹92.05 आहे. (हे देखील वाचा:

Tweet

12 दिवसांत 7.20 रुपयांनी महागले इंधन

शुक्रवारपूर्वी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली होती. तब्बल 137 दिवसांनंतर 22 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर 12 दिवसांत 10 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. या दरम्यान प्रति लिटर सुमारे ₹ 7.20 ची वाढ झाली आहे. याशिवाय, राष्ट्रीय राजधानीत शुक्रवारी सीएनजीच्या दरात प्रति किलो 80 पैशांनी वाढ करण्यात आली, तर पाईपयुक्त एलपीजीच्या दरात प्रति घनमीटर 5 रुपये वाढ करण्यात आली.