Pawar vs Pawar: अजित पवारांच्या गौप्यस्फोटांवर सुप्रिया सुळे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; देवगिरी वरील बैठक ते बारामती लोकसभेचं आव्हान बाबत पहा काय म्हणाल्या!
Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule (PC - Facebook)

कर्जतच्या एनसीपी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या शिबिरामध्ये आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. 2 जुलै 2023 दिवशी अजित पवारांनी शरद पवारांपासून दूर होऊन भाजपा-शिंदे गटासोबत हातमिळवणी करून सरकार मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांनी देवगिरीवरील बैठकीचा किस्सा देखील त्यांनी आज सांगितला आहे. यावेळी सुप्रिया सुळेंना आम्ही सरकार मध्ये सहभागी होण्याबाबत सांगितलं मात्र तिने 7 दिवसांचा वेळ मागून घेतला असं म्हटलं आणि वेळ निघून जात होता तरी काहीच निर्णय होत नसल्याचं म्हटलं. आज बोलता बोलता अजित पवारांनी बारामती लोकसभा निवडणूकीमध्ये उमेदवार देणार असल्यचीही घोषणा केली आहे. या सार्‍यावर आता सुप्रिया सुळेंचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या एकापाठोपाठ केलेल्या आरोपांच्या आणि गौप्यस्फोटांच्या मालिकांवर शांत आणि संयमी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझा सोबत बोलताना सुप्रिया सुळेंनी आपण अजित पवारांच्या देवगिरीवरील बैठकीत सहभागी नव्हतो असं म्हटलं आहे. भावाचं घर असल्याने कोणत्याही आमंत्रणाशिवाय आपण तिथे पोहचलो होतो. ही बैठक गेटक्रॅश केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच बेसिक चर्चेमधून आपल्याला 7 दिवसांचा अवधी द्या इतकंच बोलणं झाल्याचं त्या म्हणाल्या आहेत. 'कुटुंबातील संस्कारानुसार आणि एक स्त्री असल्याने स्वभावानुसारही घरातल्या सार्‍याच गोष्टी जाहीरपणे बोलायच्या नसतात' हा नियम पाळते असं म्हणत सविस्तर बोलणं टाळलं आहे. Ajit Pawar Revealed 3 Secret: सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो; शरद पवार यांच्यासंदर्भात अजित पवारांनी केले तीन मोठे गौप्यस्फोट.

बारामती मध्ये पवार विरूद्ध पवार भिडणार?

अजित पवारांनी आपण पक्षाकडून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करणार असल्याचं म्हटलं आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी लोकशाहीचा आदर व्हायलाच हवा निवडणूक ही वैचारिक लढाईंवर असते तेथे नाती नसतात त्यामुळे त्यांना पूर्ण अधिकार आहे उमेदवार उभा करण्याचा आणि त्याचा सामना निवडणुकीच्या रिंगणातच केला जाईल असे म्हणत त्यांनी आव्हान स्वीकारल्याचं म्हटलं आहे. Lok Sabha Election 2024: महायुतीच्या बारामती, सातारा, रायगड, शिरूर लोकसभेच्या जागा लढवणारच - अजित पवारांची घोषणा .

वंशाचा दिवा मुलगीही असते असे काहींचंच मत - अजित पवार

कर्जतच्या शिबिरामध्ये अजित पवारांनी 'वंशाचा दिवा मुलापेक्षा मुलगी अधिक लावते असे काहींचंच मत' असं म्हणत शरद पवारांना टोला लगावला आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी ते त्यांचं वैयक्तिक मत असं असू शकतं असं म्हटलं आहे.

शरद पवारांवर बोलताना आज अजित पवारांनी पुन्हा आपल्याला टार्गेट केलं गेलं असल्याची भावाना बोलून दाखवली आहे.