Ajit Pawar, Sharad Pawar (PC - Facebook)

Ajit Pawar Revealed 3 Secret: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत कर्जतच्या चिंतन शिबिरात अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो असं शरद पवार यांनीचं आपल्याला सांगितलं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांची सातत्याने धरसोडवृत्ती सुरू होती. शरद पवार राजीनामा देणार याची देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुप्रिया सुळेंना कल्पना देण्यात आली होती. शरद पवार मला एक सांगत होते, परंतु करत मात्र वेगळचं काहीतरी होते, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तथापी, राजीनाम्यासंदर्भात आम्ही तिघांना माहिती होतं. भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वांबरोबर चर्चा करुन घेतला. चर्चेत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटीलही होते. 2 जुलैला आम्ही भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय मान्य नव्हता तर मग आम्हाला 17 जुलैला कशाला बोलावलं? आम्हाला गाफील का ठेवण्यात आलं? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. (हेही वाचा - NCP-Ajit Pawar गटाचे दिल्लीत नवे कार्यालय सुरू; Praful Patel यांच्या हस्ते उद्घाटन (Watch Video))

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण बाहेरचं आंदोलन करण्यात आलं. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, राजीनामा परत घ्या अशी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात ठराविक तिचं लोक होती. यात जितेंद्र आव्हाड सोडले तर एकही आमदार उपस्थित नव्हता. आधी त्यांनीचं सत्तेत सहभागी होण्यास सांगितले. नंतर आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. पुन्हा राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन केलं. शरद पवार यांनी धडसोड वृत्ती यातून दिसत होती. (हेही वाचा - Devendra Fadnavis and Ajit Pawar Birthday: OMG! एका राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांचा एकाच दिवशी वाढदिवस; जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या रंजक गोष्टी)

दरम्यान, राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात कुटुंब नियोजनाचं महत्व सांगताना अजितदादांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. मुलांपेक्षा मुलीच जास्त वंशाचा दिवा लावतात, काहींना याचा अनुभव आहे, असं यावेळी अजित पवार म्हणाले.