1 जुलै दिवशी एनसीपी ने देखील सत्तेमध्ये सहभागी होत शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर अजित पवार गटाने मुंबई मध्ये एक कार्यालय तातडीने सुरू केलं. त्यानंतर आता दिल्ली मध्येही नवं कार्यालय सुरू केले आहे. आज प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते त्यांच्या नव्या कार्यलायाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. सध्या शिवसेनेप्रमाणेच एनसीपीच्या आमदारांवरील अपात्रतेबद्दलची  लढाई कोर्टात आहे. एनसीपीची  लढाई अद्याप निवडणूक कार्यालयातही प्रलंबित आहे. Nawab Malik News: नवाब मलिक कोणाचे? अजित पवार गटाच्या दाव्यामुळे उलटसुलट चर्चा; 'तो' 42 वा आमदार कोण? 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)