Pandharpur Wari 2020: ज्ञानेश्वर माऊली, जय हरी विठ्ठल आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात आज मानाच्या 9 पालख्या एस. टी बसने पंढरपूरकडे (Pandharpur) रवाना झाल्या आहेत. कोरोना संकटामुळे (Coronavirus) यंदा पहिल्यांदाच संतांच्या पालख्या बसमधून (Bus) विठ्ठलाच्या भेटीला जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2020) वारकऱ्यांना पंढरपूरला जाता येणार नाही. त्यामुळे केवळ काही वारकऱ्यांच्या उपस्थित यंदाचा पालखी सोहळा पार पडणार आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने पायी पालखी नेण्यास प्रतिबंध केल्याने संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथून शिवशाही बसने पंढरपुरकडे रवाना झाली. दरवर्षी 27 दिवसांनंतर पंढरपूर मध्ये दाखल होणारी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी यंदा केवळ काही तासात पंढरपुरात पोहोचणार आहे. (हेही वाचा -Ashadhi Ekadashi 2020 Wishes: आषाढी एकादशी निमित्त मराठी संदेश, Images, WhatsApp Status, Messages द्वारे द्या शुभेच्छा!)
नाशिक- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने पायी पालखी नेण्यास प्रतिबंध केल्याने संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथून शिवशाही बसने पंढरपुरकडे रवाना झाली pic.twitter.com/OBO0kZ06ul
— AIR News Pune (@airnews_pune) June 30, 2020
तसेच संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे विठाई बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी विठाई बस निर्जंतुकीकरण करुन आकर्षक फुलांनी सजवली होती. याशिवाय आज औरंगाबादमध्ये संत एकनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. 20 मानाच्या वारकऱ्यांसह नाथांच्या पालखीचे पंढरपुराकडे प्रस्थान झाले.
#aashadiekadashi #vithumauli #pandhrpur pic.twitter.com/QnVBID5cqK
— Rushikesh Ingale🇮🇳 (@RushikeshInga15) June 30, 2020
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. बुधवारी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्याच्या हस्ते महापूजा केली जाणार आहे. राज्यभरातून येणाऱ्या पालख्यांचे प्रतिनिधीही या महापुजेत सहभागी होणार आहेत.