Palghar Crime News: व्यापाराला बंदुकीच्या धाकाने दुकान लुटण्याचा प्रयत्न, गोळीबारात दुकानदार बचावला, पालघर येथील घटना
gun shot representative image

Palghar Crime News: पालघरच्या नागझरीच्या परिसरात काही चोरट्यांनी सोनाची दुकानातील सोनं आणि चांदी लुटलं सोबत दुकानदाराला बंदुकीच्या धारावर अज्ञात ठिकाणावर घेवून जात त्याच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेतून दुकानदाक बचावला. दुकानदार घटनास्थळावरून आरडाओरड फरार झाला. या संदर्भात पोलीसांत तक्रार केली आहे. पोलीस या घटनेचा तपास सुरु केला आहे. मनोरी पोलीसांनी या घटनेअंतर्गत तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दोन चोरट्यांनी दुकाना लुटण्याचा प्रयत्नात होते. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नागझरी नाक्यापासून नागझरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निर्मनुष्य ठिकाणी दोघांनी दुकानदाकला लुटण्याच्या उद्देशाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या, मात्र वेळी दुकानदार खाली वाकल्यानं थोडक्यात बचावला. बंदुकीतून गोळ्या झाल्यानंतर घाबरलेल्या सराफा व्यापाऱ्यानं आरडाओरडा केला आणि त्यानंतर चोरटे घटनास्थळावरून पळून गेले.

या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांचं पथकांनी धाव घेतला.असून मनोर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर पद्धतीनं तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे,या  घटनेअंतर्गत नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित राहिला आहे.