महाराष्ट्रात पालघर (Palghar) मध्ये 2 साधू आणि 1 ड्रायव्हरला 16 एप्रिल दिवशी बेदम मारून ठार करण्यात आल्यच्या प्रकरणाचे देशभर गंभीर पडसाद मिळाले आहेत. या प्रकरणी आता सीआयडीने 24 नव्या आरोपींना अटक केल्याची देखील माहिती आहे. आज या नव्या आरोपींनादेखील कोर्टात दाखल केले जाईल. सोबत 70 जणांच्या जामीनावर आज ठाणे सेशन कोर्टात सुनावणी होणार आहे. डहाणू कोर्टात न्यायाधीश पी. पी. जाधव हे या जामीनावर सुनावणी करणार आहे. Palghar Mob Lynching Case: पालघर साधू हत्याकांड प्रकरणी CID कडून 24 नव्या आरोपींना अटक; आज कोर्टात हजर करणार.
पालघर साधूहत्याकांड प्रकरणामध्ये 11 अल्पवयीन आरोपीदेखील आहेत. एकूण 366 आरोपींच्या यादींपैकी आज कोणाला जामीन मिळणार? अल्पवयीन आरोपींचे काय होणार? याबाबत कोर्ट काय निकाल देणार हे पहावं लागेल.
ANI Tweet
Palghar mob lynching incident: Bail applications of about 70 accused persons to be heard today at Thane Sessions Court. #Maharashtra
— ANI (@ANI) October 22, 2020
पालघर मध्ये गडचिंचले भागात 16 एप्रिलला 2 साधू आणि त्यांचा ड्रायव्हर गाडीने कांदिवली वरून सुरतकडे जाताना त्यांची गाडी थांबली. त्यावेळेस हे मुलांना चोरण्याच्या उद्देशाने आले असल्याचा स्थानिकांचा समज झाला. या गैरसमजुतीमधून त्यांना मारहाण झाल्याचं प्राथमिक अंदाजात सांगण्यात आले आहे. संतापाची बाब म्हणजे या मारहाणीदरम्यान पोलिस जर घटनास्थळी दाखल होते तर ते काय करत होते? पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्हं आहेत. दरम्यान यानंतर राज्य सरकारने पालघर जिल्हा पोलिस प्रमुख गौरव सिंह यांना पदावरून हटवले आहे.
पालघर हत्याकांडामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये सुशीलगिरी महाराज, चिकणे महाराज कल्पवृक्ष गिरी आणि त्यांचा चालक निलेश तेलवडे यांचा समावेश आहे. या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पालघर मधील घटनेतील आरोपींना शक्य तितकी कठोर शिक्षा होईल असे स्पष्ट केले आहे.