Murder | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

पालघर (Palghar) येथे गेल्याच आठवड्यात तीन अज्ञात नागरिकांना चोर समजून मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यामध्ये दोन साधू आणि त्यांचा ड्राइव्हर यांचा समावेश असल्याने नंतर समोर आले होते. या प्ररकरणी सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. तर पालघर मधील मॉब लिंचिंगचा हा प्रकार धक्कादायक आणि अमानवीय असल्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी म्हटले होते. तसेच या प्रकरणी 110 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले होते. तर आता पालघर मधील तिहेरी हत्याकांडाचे प्रकरण सीआयडी यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यांनी आजपासून तपासाला सुरुवात केली. तसेच या प्रकरणातील पळ काढलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे.

पालघर येथे एका गाडीतून दोन साधू आणि त्यांचा ड्राइव्हर प्रवास करत होते. त्यावेळी दाभाडी-खानवेल रोडवर तब्बल 200 आदिवसांच्या जमावाने वाहन थांबवून त्यांना खाली उतरवले. त्यानंतर जमावाने तिघांची चौकशी न करता मारहाण आणि दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या मृत्यू झाला. यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पालघर मधील घटनेतील आरोपींना शक्य तितकी कठोर शिक्षा होईल असे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत पालघर मॉब लिंचिंग प्रकरणामागे कोणतेही धार्मिक कारण नाही असे ही म्हटले होते. ऐवढेच नाही तर सोशल मीडियात सुद्धा पालघर घटनेप्रकरणी संताप व्यक्त करण्यात आला होता.(उद्धव ठाकरेंच्या राज्यात, डर से रहो अगर हिंदू हो! पालघर प्रकरणावरुन नितेश राणे यांचा घणाघाती हल्ला, पहा ट्विट)

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली मत मांडत "या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या" अशी मागणी केली आहे. झुंडबळीचा हा निर्घृण क्रूर प्रकार महाराष्ट्राची मान खाली घालणारा असून याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध रामदास आठवले यांनी केला आहे.