Khalapur News Photo credit twitter
Khalapur's Irshalwadi Landslide: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सतत चालू आहे. मुंबईतच नव्हे तर अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाली आहे. राज्यातील  अनेक खेड्या गावात नद्याच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दरम्यान रायगड येथील खालापूर गावातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खालापूर गावात काल रात्री दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. दरड कोसळल्याने  60 ते 70 ग्रामस्थ अडकले  तर, चार जणांचा मृत्य झाल्याचे समोर आले आहे. रात्रीपासून बचाव कार्य सुरु असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

बचावकार्य घटनास्थळी पोचले असून त्यांनी आता पर्यंत 25 लोकांना सुखरुप बाहेर काढल्याचे समोर आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार बुधवारी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. रात्री गावावर भलं मोठं दरड कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. आजूबाजूच्या गावातील लोकांना मदतीसाठी धाव घेतला. पोलीसांनी आणि एनडीआरएफ हे घटनास्थळी दाखल झाले.  एनडीआरएफच्या मदतीने बऱ्याच लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.राज्यसरकार या घटनेवर गंभीर दखल घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील घटनास्थळी रवाना झाले आहे.

गावातील 50 ते 60 वस्ती उध्वस्त झाली आहे. भूस्खलनाच्या घटनेत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रिक्सू टीमचे काम सुरु आहे. खालापूरच्या इर्शालगडावरील चौक गावापासून काही  किलोमीटर लांब असलेल डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे. या वाडीवर रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. या गावात 40 ते 50  घरे आहेत. ही सर्व घरे दरडीखाली आल्याची माहिती समोर आली आहे. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच अचानक ही  दरड कोसळली. त्यामुळे 60 ते 70 जण दरडीखाली दबल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर  आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी धाव घेतली.