
“माझ्या हाती राज्याचे स्टेअरिंग भक्कम आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही,” असे सूचक विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका कार्यक्रमात केले होते. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एपीबी माझाशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात. ते कार जेव्हा चालवत असतात, तेव्हा सगळे ट्राफिक थांबलेले असते. फडणवीस यांच्या टीकेनंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. दरम्यान, फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात. परंतु, ते ज्यावेळी कार चालवत असतात, तेव्हा सगळे ट्राफिक थांबलेले असते. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. मात्र, अशाप्रकारे सरकार चालवता येत नाही. सरकारकडे ट्राफिक सुरुच राहतो. यामुळे जनता योग्य उत्तर देत असल्याचे मला वाटत आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजपाच एक नंबरचा पक्ष- देवेंद्र फडणवीस
परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या हाती राज्याचे स्टेअरिंग भक्कम आहे. सरकार चालवत असताना मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत. माझ्यावर याचा काहीच परिणाम होणार नाही. तसेच पुढे कोण बसले आहे? आणि मागे कोण बसले आहे? हे महत्वाचे नाही. कार आणि सरकार दोन्ही सुरळीत आहे. सर्वजण मिळून काम करत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.