Online Fraud In Mumbai: मुंबईत एका डॉक्टराला ऑनलाईन (Online) समोसे मागवणं खर्चिक पडलं आहे. नुकसान भरपाई म्हणून त्याला 1 लाख 40 हजार रुपयांना दंड बसलाय. पीडित डॉक्टरांनी ताबडतोब हे प्रकरण भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीसांनी या घटनेसंदर्भात गुन्हा नोंदवला आहे. मुंबईतील शीव येथे राहणारे 27 वर्षांच्या डॉक्टरांनी पिकनील जाण्यासाठी काही समोसे ऑनलाईन मागवण्याचे ठरवले. पेंमेंट दरम्यान त्याला पैसाचा चांगलाच फटका बसल्याचे समोर आले आहे.
पीडित डॉक्टरांनी शनिवारी 8 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता समोसे ऑर्डर केले होते. गुरुकृपा हॉटेलमध्ये फोन करुन 25 प्लेट समोस्याची ऑर्डर दिली. पेंमेंट साठी 1500 रुपयांचं पेमेंट करायला सांगितले डॉक्टरांनी पेंमेट केले परंतू पेंमेट पुर्ण झाले नाही अस सांगत त्यांनी दुसऱ्या लिंक वर जावून पेंमेंट करायला सांगितले. त्या लिंक वरून पैसे पेंमेंट केल्यावर त्याला नंतर दोन तीन मेसेज आणखी आले, हे पाहून त्याची झोप उडाली. आपल्या अंकाऊट वरुन पैसे कट झाले आहेत. त्याला कळताच आपलं बॅंक अकांऊट ब्लॉक केले. परंतू तोपर्यंत चोरट्याने त्याच्या खात्यातून 1 लाख 40 हजार रुपये कट झालेले होते.
आपण ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकलो आहे. हे समजताच पोलीसांना तात्काळ या प्रकरणाची माहिती दिली.भोईवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेतले आहे. मुंबईतील हे प्रकरण अगदीच धक्कादायक होते. डॉक्टरांच्या खिशातले पैसे ऑनलाईन पध्दतीने गेले.