कोविड-19 लॉकडाऊनमुळे वाढलेल्या ऑनलाईन आर्थिक व्यवहारातून फसवणूकीच्या घटनाही वाढत आहेत. अशीच एक घटना मुंबई मधून समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मुंबई (Mumbai) मधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना एका वृद्ध व्यक्तीला सुमारे 41 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. 71 वर्षीय व्यक्तीने ऑनलाईन फ्रॉडमध्ये इतकी मोठी रक्कम गमावली आहे. ही व्यक्ती हिरानंदानी इस्टेट येथील रहिवासी असून एका टेस्टिंग लॅबचा मालक आहे. खाजगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर माझ्या अकाऊंटमधून इतके पैसे डेबिट झाल्याचे त्या व्यक्तीने सांगितले आहे. (दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर!)
ही व्यक्ती वृद्ध असून त्याच्यावर विविध उपचार सुरु आहेत. या व्यक्तीला अधिक हालचाल करणे शक्य नसल्याने त्याचे कर्मचारीच लॅबचे कामकाज पाहतात. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच तपासाला सुरुवात केली आहे. या व्यक्तीचे मोबाईल नेट बँकिंग एका प्रायव्हेट मोबाईल नंबरला लिंक पोलिसांना समजले आहे. (Online Fraud in Pune: इंदूर येथील ऑनलाईन स्टॉक ट्रेडिंग फर्मकडून एका तरूणाची 95 हजार 500 रुपयांची फसवणूक)
सदर व्यक्ती 17 ते 29 जून दरम्यान उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. या कालावधी दरम्यान त्यांनी कोणत्याही प्रकारचे ट्रन्जॅक्शन केले नाही किंवा कोणासोबत ओटीपी देखील शेअर केला नाही. मात्र 30 जून रोजी मोबाईल नेट बँकिंगच्या अॅपमध्ये लॉग-इन केल्यानंतर इतकी मोठी रक्कम अकाऊंटमधून गायब झाल्याचे त्यांना कळाले. फसवणूकीपूर्वी माझ्या सेव्हींग अकाऊंटमध्ये 49 लाख रुपये होते, असे या व्यक्तीचे म्हणणे आहे.