Online Education | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यातील कोरना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार पहिल्यापासूनच ऑनलाईन शिक्षणासाठी अग्रही होते. त्यानुसार राज्य सरकारने राज्यात ऑनलाईन शिक्षण (Online Education) सुरु करण्यास प्राधान्य दिले तसेच एका अर्थाने ऑनलाईन शैक्षणिक वर्ष सुरु केले. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री (School Education Minister) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आता थेट ऑनलाईन वर्ग वेळापत्रक (Online Class Schedule) जाहीर केले आहे. राज्यातील कोरोना व्हायरस स्थिती नियंत्रणात येत नाही. धोका पूर्ण टळत नाही तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार असल्याचे समजते.

ऑनलाईन शिक्षण वेळापत्रक

ऑनलाईन शिक्षण वेळापत्रक महाराष्ट्र राज्य
अं.क्र.  इयत्ता वार शिक्षणाचा कालावधी शिक्षणाचे स्वरुप
1 पूर्व प्राथमिक (बालवाडी) सोमवार ते शुक्रवार प्रति दिन 30 मिनिटे. दोन वर्ग पालकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद व मार्गदर्शन
2 पहिली व दुसरी सोमवार ते शुक्रवार प्रति दिन 30 मिनिटे. दोन वर्ग पालकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद व मार्गदर्शन, उर्वरीत 15 मिनिटं विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण
3 तिसरी ते आठवी प्रति दिन 45 मिनिटे. दोन वर्ग विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण
4 नववी ते बारावी प्रति दिन 45 मिनिटे. चार वर्ग ऑनलाईन माध्यमातून शिक्षण

प्रतिवर्षी जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरु होते. यंदाही 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले. मात्र, राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका पाहता विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. अशा स्थितीत शाळा सुरु ठेवणे शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरु किंवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. (हेही वाचा,कोविड-19 च्या वाढत्या संकटातही HSC, SSC च्या गुणपत्रिकांचे शाळा-कॉलेज मधून वाटप; MSBSHSE लवकरच जारी करणार गाईडलाईन्स )

दरम्यान,  ज्या भागात शाळा सुरु करणे शक्य नाही अशा ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवणे शक्य आहे काय हे पाहावे. तसेच, ऑनलाईन शिक्षण सुरु करावे असे नियोजन राज्याच्या शिक्षण विभागाने केले आहे. त्यानुसारच राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे ऑनलाईन शिक्षण वेळापत्रक जाहीर केले आहे.