Train Derailment Representational Image (Photo Credits: ANI)

कसारा इगतपुरी (Kasara-Igatpuri) दरम्यान 12598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा (Antyodaya Express) एक डबा घसरला. ही घटना आज (18 जुलै) पहाटे 3.50 मिनिटांनी घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र याचा परिणाम नक्कीच वाहतूकीवर झाला असल्याने मध्य रेल्वेवरची मुंबई नाशिक वाहतूक ठप्प झाली आहे. परंतु, मध्य मार्ग आणि अप मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. दुर्घटनेची माहिती ट्विट करुन देताना मध्य रेल्वेने हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केला आहे. हेल्पलाईन क्रमांक- 022-22694040.

पावसाळा सुरु झाल्यापासूनच कोणत्या न कोणत्या कारणाने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यातच सकाळच्या वेळेस ही घटना घडल्याने प्रवाशांना ऐन कामाच्या वेळेस नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. (कुर्ला स्थानकाजवळ मध्य आणि हार्बर मार्गाच्या लोकलवर दगडफेक, पाच जण जखमी; स्थानिक टोळ्यांवर संशय)

मध्य रेल्वे ट्विट:

कालच (बुधवार, 17 जुलै) मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज झालेला अपघात प्रवाशांच्या त्रासात आणि संतापात भर घालत आहे.