Local Train | Representational Image | (Photo Credits: File Photo)

मुंबईमध्ये आज (17 जुलै) पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. विठ्ठलवाडी ते कल्याण स्थानकादरम्यान ओव्हर हेड इक्विप्मेंट (पेंटाग्राफ)  (OHE problem) च्या दोषामुळे वाहतूक कोलमडली आहे. सकाळी मुंबईत ऐन पीक आव्हर्स म्हणजेच कामधंद्यासाठी, नोकरीसाठी बाहेर पडण्याचा वेळेत मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्याने रेल्वे सह स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. मध्य रेल्वेच्या या बिघाडामुळे अप लाईनची वाहतूक विस्कळीत झाली आहे. म्हणजेच सीएसटीएमकडे जाणारी वाहतूक कोलमडली आहे. सध्या मध्य रेल्वेकडून हा तांत्रिक दोष दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान आज सकाळी  कुर्ला स्थानकाजवळ मध्य आणि हार्बर मार्गाच्या लोकलवर दगडफेक, पाच जण जखमी; स्थनिक टोळ्यांवर संशय

Central Railway Tweet

मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक दोषामुळे रेल्वेचं वेळापत्रक बिघडण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. सध्या मुंबईमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरीही अधून मधून दमदार सरी बरसत आहेत. त्याचा परिणाम वाहतूकीवर होतो. तसेच दर रविवारी तांत्रिक दोष दूर करण्यासाठी खास मेगा ब्लॉकचं आयोजन केलं जातं. मात्र तरीही रेल्वे उशिराने धावत असल्याने अनेकदा मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी आंदोलनं केली आहेत.