Rajmata Jijabai Jayanti (PC - Twitter)

Rajmata Jijabai Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनीही त्या ओळखल्या जातात. यापूर्वी सिंदखेड नावाने ओळखले जाणारे ठिकाण आता बुलडाणा नावाने ओळखले जात आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक दिग्गज तसेच राजकीय नेत्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून जिजाऊंना विनम्र अभिवादन केलं आहे. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही जिजाऊ यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी आली होती.

जिजामाताच्या शिकवणीमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महारांजासारखे राजे लाभले.  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वराज्यप्रेरीका राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन केलं आहे. (हेही वाचा - Rajmata Jijau Janmotsav: आज सिंदखेड राजा येथे मोठ्या थाटात साजरा होणार राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून जिजाऊचे उपकार कधीही न फिटणारे असल्याचं म्हणत शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलीत करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा केला आहे.

राष्ट्रवादी नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जिजाऊंच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी महाराष्ट्राला शौर्य, नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा दिला. जिजाऊंच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, अशा शब्दात त्यांनी जिजाऊविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.