Buldhana Crime: होळी दहनाच्या पूर्वसंध्येला दोन गटात तुंबळ हाणामारी, बुलढाण्यातील घटना, 5 जण गंभीर जखमी
fight | pixabay.com

Buldhana Crime: ठिकठिकाणी होळीचा सण साजरा होताना पाहायला मिळत आहे. काल राज्यभरात होळीकाचे दहन केले. मात्र, होळी दहनाच्या वेळी बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला. बुलढाण्यातील विठ्ठलवाडीत होळी दहनाच्या वेळी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. होळी सणांच्या पूर्वसंध्येला बुलढाण्यात झालेल्या या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा- सोन साखळी हिसकावणाऱ्या दोघांना वडाळा पोलिस ठाण्यातून अटक

नेमकं काय प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडीत घडली. होळी दहन कार्यक्रम सुरु असताना लहान मुलांचे खेळता खेळता एका क्षुल्लक कारणावरून भांडण सुरु झाले. या भांडणावरुन गावातील दोन गटात तुफान राडा झाला. संतप्त दोन्ही गटातील लोकांनी लाठीने मारहाण करू लागले. या हाणामारीत सहा ते सात जण गंभीर जखमी झाले अशी माहिती समोर आली आहे. जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हाणामारीत महिलांचाही समावेश होता.

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात झाले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. हाणामारीत 17 जण जखमी झाले होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी परिस्थिती नियत्रंणात आणली. हाणामारी नंतर गावात शांततेचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवला नाही.