
Mumbai News: मुंबईत 15 वर्षाच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. वडाला पोलिस ठाण्यातून येथे दोघांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीना ताब्यात घेतले. ही घटना 19 मार्च रोजी वडाळा पूर्व येथील शिवशंकर नगर येथे घडली होती. दिशा ठाकून असे पीडितेचे नाव आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- महिला पोलिस कर्मचाऱ्याने मुख्यालयात केला आत्महत्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, दिशा ठाकूर घरातून कॉलेजकडे जात असताना तीची गळ्यातून चैन हिसकावून गेले. ती रस्त्यावरून चालत होती त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती तिच्या दिशेने जात होते.त्यातील एकाने सोन साखळी ओढळी. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. त्याच दिवशी दिशाचा कॉलेजमध्ये पेपर होता. त्यानंतर या घटनेची माहिती तीने घरी दिली.
पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. पोलिसांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. पीएसआय प्रशांत रणवरे यांनी सांगितले. तो पुढे म्हणाला, “ती तिची परीक्षा संपवून परत आली आणि आम्ही तिला घटनास्थळी नेले (वडाळा [पूर्व] मधील बरकत अली नाक्याजवळील स्कायवॉक). तोपर्यंत आमच्या तांत्रिक टीमने घटना शोधण्यासाठी जवळपासच्या ठिकाणी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते ते तपासले. काही तासांच्या तपासानंतर आरोपीला शोधण्यात आले. गंगा गुप्ता असं आरोपीचे नाव आहे. त्यानंतर त्याच्या साथीदाराला देखील पोलिसांनी अटक केले.जवरलाल गुप्ता असं दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.