Uddhav Thackeray. (File Photo: IANS)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून संपूर्ण महाराष्ट्रात आनंदमय वातावरण पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, ठाकरे कुटुंबियातील पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पहिले ठरले आहेत. उद्धव ठाकरे शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहेत.  मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यात राज ठाकरे यांचाही समावेश आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली होती. त्यांचा शपथविधी सोहळा आजच होणार होता. तो काही वेळापूर्वीच पार पडला आहे. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या शिवसेनेच्या दोन नेत्यांनीही शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनीही शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी आई वडिलांच्या स्मृतींना स्मरुन शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन शपथ घेतली. तर सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन शपथ घेतली. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांचा राजकीय जीवनप्रवास

एएनआयचे ट्विट-

शिवसेना आणि काँग्रेस दोन्हीही पक्ष परस्पर विचारधारेचे असून महाविकास आघाडी जास्त काळ टिकणार नाही असे विरोधकांनी मत व्यक्त केले आहे. परंतु, हे सरकार संपूर्ण 5 वर्ष टिकणार असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले होते.