देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले असून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तर दिल्लीत काही दिवसांपूर्वी तबलीगी जमातीचा एक कार्यक्रम मरकच्या इमारतीत पार पडला. या कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांनी उपस्थिती लावली होती. हा कार्यक्रम झाल्यानंतर तबलीगी समाजील नागरिक घरी परतले. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर तबलीगी समाजातील ज्या व्यक्तींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती त्यांचे नमूने जमा करत कोरोनाची चाचणी केली. त्यामधील बहुतांश जणांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे सध्या सोशल मीडियात दिल्लीत पार पडलेल्या निजामुद्दीन मरकच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर काहीजण जुने आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करत आहे. अशा लोकांच्या विरोधात आता कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपच्या मदतीने तबलीगी समाजीचा पार पडलेल्या कार्यक्रम हा संतापजनक प्रकार आहे. याच्या विरोधात जोरदार टीका केली जात आहे. परंतु काही समाजकंटक या घटनांचा वापर करुन जुने आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ वापरुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या विरोधात कठोर कारवाई सायबर सेलकडून करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.(Coronavirus: महाराष्ट्र पोलीस लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी CID आणि ACB यांची मदत घेणार)
निजामुद्दीन, दिल्लीतल्या घटनेचा वापर जुने व दिशाभूल करणारे व्हिडिओ व्हॉट्स ॲप व इतर सोश्यल मिडिया द्वारे पसरवून धार्मिक दुही/ तेढ निर्माण करणाऱ्यांना गृहमंत्री म्हणून इशारा की @MahaCyber1 अशा असामाजिक व्यक्तींवर कडक कारवाई करेल. #stopmisinformation pic.twitter.com/5Ye9uzwj0F
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 5, 2020
दरम्यान, निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमासाठी जवळजवळ 16 देशातील नागरिकांनी दिल्लीत उपस्थिती लावली होती. निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमाला जवळजवळ 2300 लोकांनी उपस्थिती लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच तबलीगी जमातीचे प्रमुख मौलानांसह अन्य जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.