Nilofer Malik Khan On Amruta Fadanvis: अमृता फडणवीसांच्या 'बिगडे नवाब' ट्विटला निलोफर मलिकयांचे ट्विटवरून प्रत्युत्तर
(Photo Credit : Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच फडणवीस यांच्या पत्नी अमृता (Amruta Fadanvis) फडणवीस यांनी टि्वट करुन नवाब मलिक यांच्यावर 'बिगडे नवाब'अशी टिका केली आहे. खोट्या गोष्टी सांगून काळी कमाई आणि जावई वाचवणे एवढच यांचे लक्ष्य आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली होती. त्यावर मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक यांनी करत उत्तर दिले आहे. (हे ही वाचा Devendra Fadnavis Tweet: डुकरासोबत कुस्ती खेळू नये, देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट; टीकाकारांवर अप्रत्यक्ष निशाणा.)

अमृता फडणवीसांचं ट्वीट 

निलोफर मलिक ट्विट 

जर आपल्याकडे काही लपवण्यासारखं नसेल तर त्यांना पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असतं तेव्हा तिथे भीती नसते. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच एकमेव आमचा अजेंडा आहे. असे म्हणत निलोफर मलिक यांनी अमृता फडणवीस यांना उत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस टिकाकारांना म्हणत आम्ही दोघेही वेगवेगळे आहोत. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. बँकर, गायिका आहे, जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. मी खऱ्याची साथ कधी सोडत नाही आणि खोट्याला साथ देणाऱ्यांना सोडत नाही', असा इशाराही अमृता फडणवीस यांनी दिला.