Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

New Year Special Mumbai Local Train Update: नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मध्य रेल्वे चालवणार विशेष उपनगरीय सेवा; इथे पहा मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेच्या वेळा

मुंबई मध्ये न्यू इयर सेलिब्रेशनसाठी रात्री बाहेर पडणार्‍यांची संख्या मोठी आहे. अशावेळी नागरिकांची घरी परतणार्‍यांची संख्या मोठी असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई लोकल विशेष फेर्‍या चालवणार आहे. यामध्ये मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रात्री उशिरा विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहे. मध्य रेल्वे कडून मेन लाईन आणि हार्बर लाईन वर 4 स्पेशल ट्रेन चालवणार आहेत तर पश्चिम रेल्वे मार्गावर 12 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वे आज मेन लाईन वर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान ट्रेन चालवणार आहे तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान ट्रेन चालवणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चागेट अशा प्रत्येकी 4-4 ट्रेन चालवल्या जाणार आहेत. New Year 2025 Celebrations in Mumbai: मुंबईत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला BEST चालवणार हेरिटेज टूर आणि समुद्र किनाऱ्यांवर अतिरिक्त बसेस; जाणून घ्या सविस्तर .

मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन

पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन

मुंबई लोकलची सेवा रात्री 12 च्या आसपास बंद केली जाते मात्र आज न्यू इयर सेलिब्रेशनच्या निमित्ताने रात्री उशिरा सेलिब्रेशन करून पुन्हा घरी जाणार्‍यांसाठी रेल्वे विशेष फेर्‍‍या चालवत आहे.दरम्यान आज न्यू इयर साठी बेस्ट कडूनही व्यवस्था करण्यात आली आहे. बेस्ट कडून समुद्रकिनारी फिरण्यासाठी हेरिटेज टूरची सोय करण्यात आली आहे.