NEET Paper Leak Latur Connection: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे लातूर कनेक्शन, दोघे एटीएसच्या ताब्यात; बिहारनंतर महाराष्ट्रात खळबळ
NEET Paper Leak Case | (Photo credit: archived, edited, representative image)

NEET Paper Leak Case: नीट परीक्षा पेपरफुटी (NEET Paper Leak Case) प्रकरण देशभरात चर्चेत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता बिहारनंतर (Bihar) महाराष्ट्रातही पोहोचले आहेत. राज्यातील नांदेड एटीएस (Nanded ATS) पथकाने या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोघेही जिल्हा परिषद शिक्षक आहेत. त्यापैकी एकजण लातूर (Latur) तर दुसरा सोलापूर (Solapur) येथे कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती आहे. एटीएस पथक या दोघांची कसून चौकशी करत आहे. या चौकशीत आणखी काही गंभीर माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) आज (23 जून) होणारी नीट पीजी परीक्षा (NEET PG Exam) पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संशयित जिल्हा परिषद शिक्षक

संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी नांदेड एटीएसने ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. लातूर आणि सोलापूर येथे धाड टाकून एटीएसने या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. पेपरफुटी प्रकरणात या दोघांचा संबंध असून त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचा एटीएसला संशय आहे. दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असल्याचाही दावा केला जातो आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या नीट (NEET) परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी केंद्र आणि राज्य सरकारांना धारेवर धरले आहे. त्यामुळे सरकार सक्रीय झाले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. (हेही वाचा, NEET Paper Leak Case: NTA महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची पदावरुन हकालपट्टी)

महाराष्ट्रात खळबळ

नीट परीक्षा कथीत गैरव्यवहार प्रकरणात लातूर येथून दोघांना ताब्यात घेल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. एपीबी माझा या खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, लातूर येथून ताब्यात घेतलेले संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील राहमारे आहेत. ते जिल्हा परिषद शिक्षक असल्याने सध्या ते सोलापूर येथील टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कर्तव्यावर आहेत. उमरखाँ पठाण हे लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहतात. ते कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत कर्तव्यावर आहेत. लातूर येथे दोघांचे खासगी कोचिंग क्लासेस आहेत. (हेही वाचा, NEET, UGC-NET Controversies: एनईईटी, यूजीसी-नेट परीक्षा वादानंतर केंद्राचा मोठा निर्णय, Public Examinations Act, 2024 लागू)

दरम्यान, नीट परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थी खासगी शिकवणी लावतात. मुंबई, ठाणे, पुणे, लातूर आदी ठिकाणी अशा शिकवण्यांचे पेव फुटले आहे. त्यातूनच हे खासगी शिकवणी घेणारे क्लास चालक आपल्या संस्थेचे, क्लासचे नाव होण्यासाठी तसेच अधिक पैशांच्या हव्यासासाठी गैरप्रकारांचा अवलंब करतात. विद्यार्थी आणि पालकही अधिक गुणांच्या हव्यासाला बळी पडून वाट्टेल ती किंमत मोजून खासगी क्लास चालकांच्या गैरव्यवहाराला बळी पडतात. ज्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. आताही नीट परीक्षेत मोठा अपहार झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे लातू शहरातही याचे काही धागेदोरे आढळतात का? याबाबत तपास सुरु आहे.