
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी मंगळवारी निवृत्त होण्याची केली होती. उत्तराधिकारी निवडण्यासाठी पक्षांच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रफूल्ल पटेल आणि अन्य नेते उपस्थित आहेत. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा प्रस्ताव समितीने फेटाळल्याची माहिती मिळाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांनी कायम रहावे यांनी ही विनंती शरद पवार यांना केली.
शरद पवारांनी पुस्तक उद्धाटनच्या कार्यक्रमावेळी केलेली निवृत्तीची घोषणा ही आमच्या सर्वांसाठी धक्कादायक गोष्ट होती. अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. शरद पवारांचा हा राजीनामा हा समितीतील सर्व लोकांनी एकानुमते नामंजूर करत असाताना पटले यांनी सध्या देशाला आणि राज्याला शरद पवारांची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच यावेळी कार्याध्यक्षपदाबाबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचे देखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
दरम्यान शरद पवांराचा राजीनामा फेटाळल्याच्या वृत्तानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचे पहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत तसेच मिठाई वाटत आपला आनंद साजरा केला, यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनात घोषणाबाजी देखील केली.