एप्रिल 2020 मध्ये राज्यसभेच्या (Rajyasabha) 55 खासदारांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे या जागी नवीन नियुक्ती करण्यासाठी 26 मार्च रोजी निवडणुका घेण्यात येणार आहेत, यापैकी 7 जागा या महाराष्ट्रातील आहेत, विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेली महाविकासाआघाडी (Maha Vikas Aghadi) यंदा राज्यसभेच्या जागांसाठी सुद्धा एकत्रच लढणार आहे. या आघाडीतील महत्वाचा घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नुकतेच राज्यसभा निवडणुकीसाठी आपले दोन उमेदवार जाहिर केले आहेत, यामध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व माजी मंत्री फौजिया खान (Faujiya Khan) याांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होणार आहे, सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य माजिद मेमन यांचा कार्यकाळही पूर्ण होणार आहे.येत्या निवडणुकीत मेमन यांच्या जागी खान यांना जागा देण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यसभेच्या 7 रिक्त जागांपैकी चार महाविकास आघाडीला मिळणार आहेत. ज्यात 2 राष्ट्रवादी काँग्रेस, एक काँग्रेस आणि एक जागा शिवसेना असे वर्गीकरण करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली दोन नावं निश्चित केली आहेत. परंतु काँग्रेस आणि शिवसेनेनं मात्र नावांची घोषणा केली नाही. पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. Rajya Sabha Election 2020: 17 राज्यांतील 55 जागांसाठी 26 मार्चला मतदान; रामदास आठवले, शरद पवार यांच्यासह दिग्गज खासदारांचा कार्यकाळ होतोय समाप्त
दुसरीकडे, भाजपाच्या रिक्त होणाऱ्या दोन जागांपैकी एका जागेसाठी रामदास आठवले यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तर दुसऱ्या जागेसाठी विद्यमान खासदार संजय काकडे यांचे नाव चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. परंतु संजय काकडे यांनी उदयनराजे भोसले यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती समोर आली आहे.