Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ही जोरदार मुसंडी मारत आली आहे. या लाटेमध्ये आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यातच राज्यात ऑक्सिजन तुटवडा पडल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. यासाठी नवा मार्ग काढत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवारांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी 190 कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलेय. शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे, असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत.हेदेखील वाचा- कोविड-19 संकटात अभिनेत्री Sushmita Sen ची मोठी मदत; रुग्णालयाला केला ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा

राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा प्रकर्षाने जाणवत असून यावर तोडगा काढण्यासाठी केंद्राकडून पुरवठा करण्याबाबत पाठपुरावा करून मदत घेतली जात आहे. दरम्यान राज्यात तात्काळ ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी 190 कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलेय. शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे, असंही आवाहन करण्यात आलेलं आहे.

शरद पवारांच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. "ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे व तसेच ज्यांचे सहविजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. तसेच कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत व त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल" असे या पत्रात म्हटले आहे.