Supriya Sule (Photo Credits-Twitter)

सत्तेत असलेले सरकार विरोधकांवर सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) ची कारवाई करत असल्याची टीका राष्ट्रावादी (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. त्यामुळे माझ्याविरोधात सीबीआय किंवा ईडी ने नोटीस काढून दाखवावी असे आव्हान सुळे यांनी सरकारला दिले आहे. विरोधकांवर होणाऱ्या या कारवायांमुळेच राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी शिवसेना-भाजप युतीच्या दिशेने वळत असल्याचे ही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे या सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहेत. मात्र जर त्यांनाच ईडी आणि सीबीआयची नोटीस आल्यास त्यावर तुम्ही काय भुमिका घेणार असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावेळी मी असे काही केलेच नसून याबाबत मला नोटीस कशाची येईल. तसेच सुरुवातीला ही गोष्ट कठीण होईल पण विजय माझाच होईल असे ही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.(सोलापूर: वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यावर कारवाई)

संवाद ताईंशी या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांनी ईडी आणि सीबीआयवर निशाणा साधला होता. त्याचवेळी त्यांनी या मुद्द्यावर चर्चा करत मला संघर्ष करण्यात मदा येते असे त्यांनी म्हटले. तसेच सोलापूर येथे संवाद ताईंशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.