राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यहे सरकारी जमीन बेकायदेशीर पणे स्वतःच्या नावावर करून घेण्याच्या प्रकरणात पुरते अडकले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्देश देत मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. मुंडे यांच्यावर अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील जमीन बेकायदेशीर रित्या हस्तांतरित करण्याचा आरोप आहे, त्याबाबत आज न्या. पी. व्ही. नलावडे व न्या. मंगेश पाटील यांनी यांच्या न्यायपीठाखाली सुनावणी पार पडली.
बेळखंडी मठाला बक्षीस म्हणून सरकारी जमीन देण्यात आली होती होती.या मठाधिपतींच्या निधनानंतर या जमिनीवरून गिरी, देशमुख व चव्हाण या तिघांमध्ये मालकी हक्काचा वाद सुरु होता. या दरम्यान मुंडे यांनी 1991 मध्ये जगमित्र शुगर फॅक्ट्रीसाठी 24 एकर जमीन खरेदी केली होती. ज्यात या जमिनीचा समावेश होता. या व्यवहाराच्या विरोधात राजाभाऊ फड यांनी ही सरकारी जमीन आहे. त्यामुळे ती ट्रस्ट्र किंवा खासगी व्यक्तीला विकत घेता येत नाही, असा आक्षेप घेतला होता. या प्रकरणी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी देखील त्यांने केली होती. या मागणीला मान्यता देत कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी साखर कारखान्याच्या जमिनी लुबाडल्या, त्यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल; पंकजा मुंडे यांचा आरोप
दुसरीकडे मुंडे यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कोर्टात मांडलेल्या मुद्द्यानुसार हा आरोप केवळ राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचे म्हंटले आहे. याशिवाय सरकारी रेकॉर्ड्समध्ये या जमिनीची नोंद इनामी जमीन म्हणून नव्हती तसेच विक्री करण्याचा मालकी हक्क देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून जमीन खरेदी करण्यात आली असा युक्तिवाद करून मुंडे यांच्या वकिलाने औरंगाबाद खंडपीठाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे धाव घेणार असल्याचे सांगितले आहे.