पंकजा मुंडे (Photo credit : youtube)

आज पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची बीडमध्ये सभा योजित करण्यात आली होती, यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांच्यावर टीकास्त्र सोडले. धनंजय मुंडे यांनी कारखान्याच्या नावाने लोकांच्या जमिनी लुबाडल्या आहेत, इतकेच नाहीत तर मयत व्यक्तींच्या जमीनी देखील जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून घेतल्या आहेत. त्यामुळे यांच्यावर 420 चा गुन्हे दाखल आहे, त्यांची चार्जशीट तयार होत आहे; त्यामुळे धनंजय मुंडेंनी लोकांना शिकवू नये. अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जप्तीची नोटीस बजावण्यात आली, याबाबतची खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त करून दाखवली होती. स्व. गोपीनाथराव मुंडे व स्व. अण्णांनी या साखरकारखान्याची उभारणी केली, मात्र ते वैभव वारसांना जपता आले नाही असे ते म्हणले होते. त्यांच्या याच मतांचा पंकजा मुंडे यांनी समाचार घेतला. (हेही वाचा: मोबाईल खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप; कसून चौकशी करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी)

‘मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, मात्र हा कारखाना आधी धनंजय मुंडे यांच्याकडे होता. त्यावेळी त्यांनी अनेक कारनामे केले. आता मी सत्तर टक्के लोकांचे पैसे दिले आहेत. एकाही शेतकऱ्यांचा रुपया ठेवणार नाही. वेळ पडल्यास स्वतःचे पैसे, जमीन गहाण ठेवेन आणि शेतकऱ्यांना पैसे देईन.’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान काही दिवसांपूर्वी महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकज मुंडे यांनी मोबाईल खरेदीमध्ये तब्बल 106 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. या सर्व प्रकारांची कसून चौकशी केली जावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली होती.