अजित पवार (Photo Credits: PTI)

मध्य प्रदेशात काँग्रेसचे कमलनाथ सरकार अडचणीत आणणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच महाराष्ट्रातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असे सांगत सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया देऊन तुफान फटकेबाजी केली आहे. आमच्याकडे कुणीही ज्योतिरादित्य होणार नाही. परंतु, आपल्या पक्षातच कोणी ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, याचीच काळीजी घ्यावी, असे बोलत अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांपासून सिंधिया हे नाराज होते. मात्र, पक्षाकडून दाखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिला होता. त्यांनी भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे.तेव्हापासून राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती. आता याच महाविकास आघाडीला सत्तेत येऊन 100 हून अधिक दिवस उलटले आहेत. दरम्यान, भाजप विरुद्ध सत्ताधारी असे वातावरण निर्माण झाले आहे. दोघेही एकमेकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारला धक्का देणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुद्दा घेऊन सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे. राज्यातील शिवसेना- भाजप युती नेमकी कशामुळे तुटली? कोणी कोणास फसविले याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर गुरुवारी विधानसभेत पूर्णविराम मिळाला. होय, आम्ही शिवसेनेला फसविले. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू. आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा होता. हे देखील वाचा-'प्रियंका चतुर्वेदी यांचे काम दिसले, आमचे नाही!' शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी विधानसभेत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. आमच्याकडे कोणीही ज्योतिरादित्य सिंधिया तयार होणार नाही. तुम्हीच जरा संभाळून राहा. नाहीतर तुमचीच माणसे इकडे तिकडे जातील. आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा. बरेच जण गैरहजर आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा, असे अजित पवार म्हणाले आहेत.

ज्योतिरादित्य सिंधीया यांनी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत काम केले होते. मात्र, 10 मार्च रोजी त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का असल्याचे समजत आहे. काँग्रेसने गेल्या अनेक वर्ष सत्ता गाजवली. परंतु, काँग्रेस पक्ष अनेक राज्यात संघर्ष करताना दिसत आहे.