 
                                                                 साताऱ्याचे राजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पक्षाला रामराम करून भाजपमध्ये जाणार असल्च्या चर्चा गेले अनेक दिवस चालू आहेत. याबाबतील राजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही भेट घेतली होती. राष्ट्रवादीला पडत चालेले खिंडार पाहून आता खा.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उदयनराजे यांची मनधरणी केली असल्याची बातमी मिळत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सातारा इथे बंद खोलीत चर्चा झाली आहे. त्यावर 'मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही', अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोल्हे हे उदयनराजेंची मनधरणी करण्यात अयशस्वी ठरल्याचं स्पष्ट होत आहे.
सोलापूर येथील सभेत उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात होते. मात्र तसे काही घडले नाही, याबाबत अजूनतरी कोणताही ठोस निर्णय झाला नाही. याबाबत एका वृत्तसंस्थेशी बोलताना उदयनराजे यांनी हा निर्णय आपल्या सहकाऱ्यांवर सोपल्याची माहिती दिली आहे. काल याबाबत चर्चा करण्यासाठी सातारा इथे एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी समर्थकांनी विचार करून निर्णय घ्या असे उदयनराजे यांनी त्यांना सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल असणारा रागही व्यक्त केला. (हेही वाचा: खा. उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘भाजप’प्रवेश चर्चेला उधाण; राष्ट्रवादीला खिंडार पडायला सुरुवात)
‘एनसीपीने माझे एकही काम केले नाही. मी अनेकवेळा बोलून दाखवले मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. जनतेसाठी आम्ही लढलो, आंदोलना केली. त्याबाबत आमच्यावर केसही झाली. माझ्यावर विनाकारण खंडणीचा गुन्हा दाखल झाला. या सर्वाचे आम्हाला काय फळ मिळाले?’ अशा शब्दांत उदयनराजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अमोल कोल्हे आणि प्रवीण गायकवाड यांनी उदयनराजे यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे मात्र तोही प्रयत्न निष्फळ ठरला आहे. आता अंतिम निर्णय ते आणि त्यांचे सहकारीच घेणार आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
