उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या नालगांच्या कंपन्या, कारखाने, व्यवसाय आणि कार्यालये यांवर आयकर विभाग (Income Tax Department) आज (7 ऑक्टोबर) सकाळपासून छापेमारी करत आहे. आयकर विभागाच्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यानी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. 'उत्तर प्रदेशमधील हिंसाचार आणि विविध प्रश्नांवर मी आणि विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि घेतलेल्या भूमिकेमुळेच अशा प्रकारची कारवाई केली जात आहे. अशा प्रकारे कारवाई करणे म्हणजे अधिकाराचा अतिरेक आहे', असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
शेतकरी आपली भूमिका अहिंसक पद्धतीने मांडण्यासाठी जात असताना त्याच्या अंगावर सत्ताधाऱ्यांनी वाहनं घातली जातात. यात काही शेतकऱ्यांचा चिरडून मृत्यू होतो. देशात हे अलिकडेच घडत आहे. देशात यापूर्वी हे कधीच घडले नव्हते. घडलेल्या घटनेचा सर्वांनी निषेध केला आहे. महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत निशेष व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मिही त्याबाबत आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे. आम्ही लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचाच संताप सत्ताधारी पक्षातील काही लोकांना आला. त्याची प्रतिक्रिया म्हणजेच आज सुरु असलेली छाप्यांची कारवाई, असल्याची शक्यता आहे, असेही शरद पवार म्हणाले. (हेही वाचा, Income Tax Department च्या रडार वर अजित पवार यांचे निकटवर्तीय; जरंडेश्वर सह काही साखर कारखान्यांवर छापे)
व्हिडिओ
कर वसूली करण्याबाबत आयकर विभागाला काही वाटलं आणि तर त्याची चौकशी करण्याचा त्यांना नक्कीच अधिकार आहे. त्यांना ज्या व्यवहार अथवा प्रकरणांबाबत संशय आहे त्याच्याशी ज्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही, अशा संस्था, व्यक्ती यांबाबत हा अधिकार वापरणे म्हणचे अधिकार वापराचा अतिरेक असल्याचे शरद पवार म्हणाले. देशातील संस्थांनी वापरलेला अधिकाराचा अतिरेक किती दिवस सहन करायचा याचा विचार आता लोकांनीच करायला हवा, असे पवार म्हणाले. काही लोक काही वेडीवाकडे विधाने करतात. त्यानंतर लगेचच केंद्रीय संस्था पुढे येतात आणि कारवाई करता, अनेक ठिकाणी छापा टाकत असतात. हे सगळे आश्चर्य वाटणारे असल्याचेही पवार म्हणाले.