Gulabrao Patil | (Photo Credit: Facebook)

राज्यात सध्या राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या गटांचे नेते विविध दावे करत आहेत. तरी राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) नेमक चाल्लं तरी काय हे आता सर्वसामान्यांच्या डोक्यावरुन जाण्यासाखं आहे. आज ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अजब दावा केला आहे. शिंदे गटातील सोळा आमदार अपात्र ठरुन जेव्हा राज्यातील सरकार पडेल तेव्हा म्हणाले की कॉंग्रेसचे (Congress) २२ आमदार भाजपात प्रवेश करणार आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री करत राज्यात नवीन सरकार स्थापन होईल असं भाकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलं आहे. तर ठाकरे गटा पाठोपाठचं आता शिंदे गटाचे (Shinde Group) नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी देखील एक खळबळजनक खुलासा केला आहे.

 

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले की राष्ट्रवादीचे (NCP) 10 ते 12 आमदार फुटले आहेत. आता फक्त त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरायचा बाकी आहे. राष्ट्रवादीने याआधीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत (BJP) शपथ घेतली होती. आताही शिंदे गटाने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, असा खळबळजनक गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Politics: कॉंग्रेसचे 22 आमदार भाजपात जाण्यास सज्ज, ठाकरे गटाकडून गौप्यस्फोट)

 

राज्यातील राजकारणात नेमक चाल्ल तरी काय सगळ्या पक्षातील नेते जर आपले पक्ष सोडून सत्ताधारी पक्षातचं येणार असेल तर राज्याच्या राजकारणात विरोधक उरणार कोण असा सवाल आता राज्याच्या राजकारणात उपस्थित झाला आहे. तरी गुलाबराव पाटलांच्या या खुलास्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यावर काय प्रतिक्रीया देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.