राज्यात सध्या शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) आहे. शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात हे सरकार उदयास आलं आहे. जवळपास सरकार स्थापन होवून ५ महिने झाले असुन विरोधक कायम हे सरकार लवकरचं पडणार असल्याचं भाकीत करताना दिसतात. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), कॉग्रेस (Congress) यांच्याकडू शिंदे गटासह भाजपावर विविध टीका टिपण्णी होताना दिसते. महाराष्ट्राच्या सत्तातराची (Maharashtra Politics) लढाई अजूनही सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. तरी या लढाईत शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवल्यास शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Governemnet) कोसळून राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याचा अंदाज आहे. तरी याबाबींचा बंदोबस्त म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एक चाणाक्य निती आखून ठेवली आहे. असं भाकीत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. शिंदे गटातील सोळा आमदार अपात्र ठरल्यास कॉंग्रेसचे २२ आमदार भाजपास पाठींबा दर्शवणार असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

 

सर्वोच्च न्यायलयाकडून शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरवल्यास त्या १६ आमदारांमध्ये खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाचाही समावेश आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे यांची आमदारकी देखील धोक्यात असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाकारता येत नाही. पण चंद्रकांत खैरेंच्या या गौप्यस्फोटानंतर राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. (हे ही वाचा:-Nawab Malik: नवाब मलिकांची संपत्ती जप्त होणार? मलिकांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला परवानगी)

 

काँग्रेसचे 22 आमदार फडणवीस यांच्यासोबत जातील असे विधान करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. यावर बोलतांना पटोले म्हणाले की, ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही, असा खोचक टोला पटोले यांनी खैरे यांना लगावला आहे. तर चंद्रकांत खैरेंच्या या विधानानंतर आता भाजप शिंदे गट तर लांबचं पण शिवसेना आणि कॉग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.