राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि तत्कालीन महाविकास आघाडीतील मंत्री नवाब (Nawab Malik) मलिक गेले अनेक महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील (Govawala Compound) जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे (Bandra), कुर्ला (Kurla) येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील (Osmanabad) शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तरी संबंधीत प्रकरणीची ईडी चौकशी सुरु आहे. पण या प्रकरणात आता वेगळाच ट्वीस्ट (Twist) आला आहे. नवाब मलिकांची मुंबईसह (Mumbai) उस्मानाबाद (Osmanabad) येथे असलेले संपत्ती जप्त करण्याची ईडीला परवानगी देण्यात आली आहे. तरी कोर्टाच्या कुठल्याही ठोस निर्णयापूर्वीच आता नवाब मलिक (Nawab Malik) यांची संपत्ती जप्त होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी कायदेशीर सल्लामसलत करत आहेत.
ईडीकडून (ED) ही संपत्ती जप्त झाल्यास नवाब मलिकांना (Nawab Malik) मोठा फटका बसणार आहे. कारण नवाब मलिकांसह त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर देखील ईडीकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील (Goawala Vompound) जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेला तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम (Bandra West) येथील दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील 147 एकर शेतजमिनीचा समावेश आहे. (हे ही वाचा:- Mumbai Threat Call: मुंबईचा हाजीअली दर्गा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन)
आर्यन खान (Aryan Khan) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक करण्यात आली होती. अटकेला दहा महिने उलटून गेल्या नंतरही या प्रकरणी मलिकांना कुठलाही दिलासा मिळाला नसुन उलट आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहीण हसना पारकरशी (Haseena Parker) संबंधित मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात ईडीने कारवाई करत नवाब मलिक यांना अटक केली होती. तरी कोठडीत असताना सध्या मलिकांची तबेत बरी नसल्याने ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.