मुंबईत (Mumbai) आतापर्यंत अनेक छोट्या गल्लीबोळ्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा हस्तगत करण्यात आला आहे. यात अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या डोंगरी (Dongri), वाडी बंदर (Wadi Baundar) आणि नागपाडा (Nagpada) भागात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने धडक कारवाई केली आहे. NCB ने टाकलेल्या या छाप्यात ड्रग्ज साठ्यासह 3 जणांना अटक करण्यात आली आहे. NCB टीमने काल (27 फेब्रुवारी) रात्री ही कारवाई केली आहे. NCB ची मुंबईतील अनेक भागात ही धडक कारवाई सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या अंधेरी भागातून एका ड्रग्ज पेडलरला (Drugs Peddler) अटक करण्यात आली आहे. अकबर चौखट असे आरोपीचे नाव आहे. या ड्रग्ज पेडलरकडून 5 लाख किंमतीचे MD ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. नारकोटिक्स सेंट्रल ब्युरोच्या (NCB) अधिका-यांनी याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत मुंबईतून अनेक ड्रग्ज पेडलर्सला अटक झाल्याने मुंबईत पसरलेले मोठे ड्रग्ज रॅकेट समोर येत आहे.हेदेखील वाचा- मुंबई: अंधेरी भागातून ड्रग्ज पेडलर अकबर चौखट ला अटक, 5 लाखांच्या MD ड्रग्जचा साठा जप्त
Mumbai: Narcotics Control Bureau has arrested 3 persons in drug raids conducted in Dongri, Wadi Bunder and Nagpada areas, last night
— ANI (@ANI) February 28, 2021
दरम्यान रविवारी (21 फेब्रुवारी) ला मुंबईच्या डोंगरी भागात 25 किलोचा मेफेड्रॉन ड्रग्जसाठा (Mephedron Drugs) जप्त करण्यात आला असून याची किंमत जवळपास 12.5 कोटी इतकी आहे. यात एकाला अटक देखील करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपीकडून 5 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर सलग एक दिवसाने मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
महिन्याभरापूर्वी मुंबईच्या मिरारोड परिसरातील एका हॉटेलमध्ये छापा टाकला. या छाप्यात ड्रग्जचा पुरवठा करणारा चांद मोहम्मद याला रंगेहात पकडण्यात आले.