Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

Nawab Malik on Sameer Wankhede:  ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे. मलिक यांनी ट्विट करत असे म्हटले की, तुमच्या मेव्हणीचा ड्रग्ज व्यापाऱ्यात सहभाग होता? या आरोपावर समीर यांचे स्पष्टीकरण सुद्धा समोर आले आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत असे म्हटले की, समीर दाउद वानखेडे तुमची मेव्हणी हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्ज व्यापारात होती? तुम्ही यावर उत्तर द्यावे. कारण त्यांचे हे प्रकरण पुणे कोर्टात प्रलंबित आहे. हा पहा पुरावा. ट्विटमध्ये मलिक यांनी काही स्क्रिनशॉट सुद्धा शेअर केले आहेत. त्यामध्ये एका केसचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे.

नवाब मलिक यांनी शेअर केलेले काही स्क्रिन शॉट हे आधी पासूनच शेअर करण्यात आलेले आहेत. असा दावा केला जात आहे की, हर्षदा रेडकर ही समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांची बहिण आहे.(Mumbai Drugs Case: ललित हॉटेलमधील CCTV फुटेजचा तपास करा, मोहित कंबोज यांचे नवाब मलिक यांना प्रतिउत्तर)

Tweet:

नवाब मलिक यांच्या ताज्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी असे म्हटले की, हे प्रकरण 2008 मधील असून त्यावेळी मी एनसीबीचा हिस्सा सुद्धा नव्हतो. त्यांनी क्रांती रेडकर हिच्यासोबत 2017 मध्ये लग्न केले. यामुळे हर्षदाच्या प्रकरणी त्यांचे काही देणेघेणे नाही.

मलिक हे क्रुज पार्टी संबंधित प्रकरण हे आधीपासून बनावट असल्याचे सांगत आले आहेत. या प्रकरणी ते एनसीबीच्या मुंबई परिसरातील झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. याच दरम्यान, समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिक यांच्या वडिलांवर मानहानिचा गुन्हा दाखल केला होता. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी आरोप लावला आहे ती, त्यांच्या परिवाराबद्दल मीडियात चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. असे ही म्हटले की, नवाब मलिक आरोपांच्या कारणास्तव समीर यांची बहीण यासमीन हिचे करियर खराब झाले आहे. यासमीन ही पेशाने वकील आहे.