Mohit Kamboj (Photo Credits-ANI)

Mumbai Drugs Case:  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर आता मोहित कंबोज यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मोहित यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, मी स्वत: एका दाढीवाल्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. तो दाढीवाला व्यक्ती काशिफ खान आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की, आसिफ खान यांचा मंत्री असलम शेख यांच्यासोबत काय नाते आहे? जो वारंवार त्यांना क्रुजवर येण्यासाठी सांगत होता. ललित हॉटेलमध्ये दारु, शबाब आणि कबाब यांच्यासह चौथे नाव नवाब असे असायचे.

समीर खान आणि चिंकू पठाण यांच्यामध्ये काय नाते आहे असा सवाल कंबोज यांनी उपस्थितीत केला. नवाब मलिक यांनी असे म्हटले की, मी कधीच सुनिल पाटील यांना भेटलो नाही. पण त्यांचा फोन आला होता. त्यांनी पत्रकार परिषदेत स्वत: कबुल केले आहे. मी ललित हॉटेलमध्ये गेल्या 5 वर्षात कधीच गेलो नाही.(Aryan Khan Cruise Drugs Party Case: नवाब मलिक यांचा Mohit Kamboj वर हल्लाबोल; आर्यन खानला अडकवून खंडणी वसूल करण्याचं षडयंत्र)

Tweet:

मोहित कंबोज यांनी आरोप लावत असे म्हटले की, 1400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी अजित पवार यांच्याकडे कशी आली याचे उत्तर मलिक यांनी द्यावे. सह्याद्री गेस्ट हाउस मध्ये कोणत्या नेत्याची बंद खोलीत अंडरवर्ल्ड लोकांसोबत झाले यावर मलिक यांनी स्पष्टीकरण द्यावे. त्याचसोबत अनिल देशमुख आणि चिंकू पठाण यांची 20 जानेवारी 2020 मध्ये सह्याद्री गेस्ट हाउसवर जी बैठक झाली तो दाउद इब्राहिमचा व्यक्ती आहे.

त्याचसोबत ताज प्रेसिडेंसी हॉटेलच्या खासगी शूटमध्ये काही नेत्यांची मुलं काशिफ खान याच्यासोबत पार्टी करायचे त्याबद्दल मलिक यांनी खुलासा करावा. ललितमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पहावे. कारण मी तेथे जात होतो की नवाब मलिक याचा खुलासा होईल. ऐवढेच नव्हे तर 3000 कोटींची संपत्ती मलिक यांनी कशी उभी केली यावर ही मलिक यांनी उत्तर द्यावे. आम्ही ड्रग्ज फ्री मुंबईवर काम करत आहोत. मी कधीच म्हटले नाही की, मी भाजपचा नेता आहे. मोहित यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. असलम शेख यांनी उत्तर द्यावे की, त्यांचे काशिफ खान सोबतचे काय नाते आहे.