Aryan Khan Cruise Drugs Party Case: नवाब मलिक यांचा Mohit Kamboj वर हल्लाबोल; आर्यन खानला अडकवून खंडणी वसूल करण्याचं षडयंत्र
Nawab Malik | PC: TWitter/ANI

मागील महिन्याभरापासून आर्यन खान (Aryan Khan) आणि मुंबई गोवा क्रुझ पार्टी प्रकरण चर्चेमध्ये राहिलं आहे. आता या प्रकरणामध्ये दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत आणि त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काही दिवसांपूर्वी दिवाळीनंतर फटाके फुटणार असे संकेत दिले होते. त्यानुसार आज पत्रकार परिषद घेऊन आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड भाजपाचा मोहित कम्बोज (Mohit Kamboj) असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे. यामध्ये एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्यांचे साथीदार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते पण दैव बलवत्तर म्हणून त्याचं सीसीटीव्ही फूटेज मिळालं नाही पण स्थानिकांनी बॉडीगार्ड सह अलिशान गाडीतून कुणी आल्याची माहिती दिली आहे असेही ते म्हणाले.

आर्यन खान हा मुंबई-गोवा क्रुझ वर ड्रग्स पार्टीमध्ये एनसीबी च्या अटकेमध्ये होता. पण आर्यन तेथे तिकीट काढून गेला नव्हता तर प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या द्वारा क्रूझवर आला होता. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. असा मलिकांचा दावा आहे. मोहित कंबोज हा 1700 कोटी रुपये भ्रष्टाचार करणारा एक व्यक्ती आहे. दीड वर्षापूर्वी सीबीआयची छापेमारी करण्यात आली होती पण हे प्रकरण दाबण्यात आलं. सध्या समीर वानखेडे यांना वाचण्यासाठी मोहित कंबोज आणि सॅम डिसुझा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग असल्याची टीका मलिकांनी केली आहे. नक्की वाचा: Nawab Malik Daughter's Letter: : नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक-खान यांचे सोशल मीडियावर भावनिक पत्र, म्हणाल्या 'मुलांनी मित्र गमावले, मला ड्रग पेडलरची बायको संबोधलं' .

ANI Tweet

दरम्यान अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा, ऋषभ सचदेवांना घेऊन जात असल्याचा व्हिडीओ मंत्री नवाब मलिकांनी दाखवला होता. त्यांचे कुटुंबीय त्यांना घेऊन जात असल्याचं दाखवलं जात असल्याचं पहायला मिळलं होतं. पण यामध्ये मोहीत कंबोज यांचे नातेवाईक असल्यानेच त्यांना सोडण्याचं आम्ही सांगितलं. त्यानंतर समीर वानखेडेंनी पत्रकार परिषद घेऊन 14 जणांना अटक केल्याचं सांगितलं. पण त्या 14 लोकांची नावं सांगितली नाही. पण या तिघांना सोडण्यात आलं हाच मोठा खेळ आहे. असेही ते म्हणाले.

आज नवाब मलिकांनी सॅम डिझुझाची एक ऑडिओ क्लिप देखील ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डिसुझा आणि एनसीबी अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.