आर्यन खान (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Case) प्रकरणाचा तापास एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. हा तपास आता एनसीपीच्या एका अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशासकीय वर्तुळातही याबाबत दबक्या आवाजात बोलले जात आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत ही भूमिका लावून धरली होती. त्यानंतर या प्रकरणात विविध घडामोडी घडत गेल्या. दरम्यान, नवाब मलिक यांच्या कन्यात निलोफर मलिक-खान (Nilofar Malik-Khan) यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
निलोफर मलिक खान यांचे पती, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनाही एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणावर आतापर्यंत मौन बाळगलेल्या निलोफर यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पत्र लिहीत निलोफर यांनी म्हटले आहे की, 'लोकांनी आपल्याला ड्रग पेडलरची बायको म्हणून लोकांनी हिणवलं. माझ्या मुलांच्या मित्रांनीही त्यांच्याशी नाते तोडले.' (हेही वाचा, Sameer Wankhede Case: मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंची जागा घेणार संजय कुमार सिंग, जाणून घ्या कोण आहेत संजय कुमार सिंग ?)
ट्विट
An Open Letter From The Wife Of An Innocent: THE BEGINNING#OpenLetter #SameeeKhan #NiloferMalikKhan #SameerWankhede #JusticeForSameer #WeWontBackDown #justiceoverinjustice #nawabmaliksameer pic.twitter.com/CEyVwSGiyd
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 6, 2021
निलोफर यांच्या पत्राची सोशल मीडिया, राजकीय वर्तुळ आणि समाजातही जोरदार चर्चा सुरु आहे. समिर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरण काढून घेण्यात आले. या प्रकणाच्या तापासाची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, 'कोणीही जनतेला गृहीत धरु नये. जे गुन्हेगार आहेत, अपराधी आहेत त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. इतरांनाही मी अवाहन करेन की त्यांनी पुढे यावे आणि आमच्यासोबत लढा द्यावा.' निलोफर यांनी सोशल मीडियात लिहिलेल्या या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे.