Nawab Malik on Petrol-Diesel Price: देशभरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर होते. मात्र आज इंधनाच्या दरात कपात केल्याने त्यावरुन आता विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशातच राज्य सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर इंधनाच्या दरात कपात केल्याने हल्लाबोल केला आहे. मलिक यांनी असे म्हटले की, देशात होणाऱ्या पोटनिवडणूकांच्या निकालामुळे शुल्क कपातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचसोबत भाजप पक्षाला तुम्ही जितक्या वेळा पराभूत करात तितके पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील असे मलिक यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेनेने सुद्धा भाजपवर टीका केली आहे.
वाढलेल्या इंधनाच्या दरामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली होती. तर काही जणांनी इंधन दरावर नाराजी व्यक्त केली होती. परंतु त्याच दरम्यान वारंवार विरोधकांकडून वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन टीका करण्यात येत होती. अखेर केंद्र सरकारकडून आता पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे. यामुळे आता पेट्रोल पाच तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे.(Rohit Pawar On Pm Modi: इंधनदर कपातीनंतर 'रोहित पवारां'चा केंद्राला सल्ला)
दरम्यान, पोटनिवडणूकीत झालेल्या पराभाच्या कारणास्तव आता दर कमी केल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे. परंतु करण्यात आलेली ही कपात अत्यंत किरोकळ असल्याचे ही विरोध म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवर मलिक यांनी असे म्हटले की, भाजपचा वारंवार पराभव केल्यास पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील. सारखी होणारी लूट थांबवायची असल्यास भाजपला पूर्णपणे पराभूत करावे असे आवाहन मलिक यांनी नागरिकांना केले आहे.