Navratri 2022 | File Image

हिंदूंच्या मोठ्या उत्सवापैकी एक नवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. शक्ती आणि उपासनेचा हा उत्सव पुढील नऊ दिवस दणक्यात साजरा केला जाणार आहे. संपूर्ण देशात नवरात्रीचा विशेष उत्साह असतो. नवरात्री हा सण श्रध्देचा, उपासनेचा, देवी आईच्या जागराचा आहे. देशातील विविध राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. पश्चिम बंगालची दुर्गापूजा, गुजरातच्या दिंडीया असा विविधतेने नटलेला हा उत्सव असतो. राजकिय नेत्यांन पासून ते सिनेअभिनेत्यां पर्यत नवरात्री उत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना नवरात्रीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच प्रमाणे राज्यातील विविध नेते मंडळींनी ट्वीट करत नवरात्री निमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत राज्यातील जनतेला नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन शारदीय नवरात्रीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

 

आई अंबाबाई, तुळजा भवानी, महिषासुर मर्दिनी, सरस्वती आदी स्त्रीशक्तींना वंदन करत राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी देखील राज्यातील तमाम जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महिला सक्षमीकरण व स्त्री सन्मानासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा दृढ निश्चय या उत्सवात करू या. असा आदिशक्तींचा जागर करत राष्ट्रावादी कॉंग्रेसचे सर्वौसर्वे शरद पवार यांनी देखील नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील नवरात्रीच्या मंगलमयी शुभेच्छा दिल्या आहेत.