Navi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये एका चार वर्षीय मुलाचं डोकं सानपाडा रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Sanpada Railway Platform) जमिनीवर आपटून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान दुसर्‍या पत्नीसोबत झालेल्या घरगुती भांडणाच्या रागातून मुलाची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. या घटनेमधील 23 वर्षीय आरोपी सानपाडा फ्लायओव्हर खाली राहत होता. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपीचं नाव सकलसिंग पवार आहे. तो मूळचा यवतमाळचा आहे. पोलिसांनी कारवाई करत त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सुरूवातीला पोलिसांनी आरोपीकडे विचारणा करताच त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याने पोलिसांना माहिती देताना त्याच दुसर्‍या पत्नीसोबत झालेल्या भांडणात रागातून पत्नीने मुलाला मारलं असं सांगितलं. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज द्वारा घटना पाहता त्यांना आरोपीनेच मुलाला जमिनीवर आपटल्याचं स्पष्ट दिसलं आणि त्यांनी पुढे आरोपीला ताब्यात घेतलं. Pune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या.

दरम्यान ही घटना सानपाडा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर घडली आहे. या ठिकाणी मुलाला आपटताना पाहून काहींनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ते सारे फोल ठरले. मृत मुलाचं नाव प्रशांत आहे. प्रशांत हा आरोपीच्या पहिल्या पत्नी सोबतच्या संबंधांतून झालेला मुलगा आहे. दुहेरी प्रेमप्रकरणामध्ये मुलाचा नाहक बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.