Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Navi Mumbai: संपत्ती आणि पैशांसाठी लोक काय काय करतील सांगता येत नाही. लोक कागदोपत्री फेरफार करता, लोकांना फसवतात, गंडवतात हे ठिक आहे. पण नवी मुंबईतील सानपाडा (Sanpada) येथे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीला जीवंत दाखविण्यात आले आहे. धक्कादयक म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे बोगस व्यक्तीला उभे करुन शिरवणे एमआयडीसी (Shiravane MIDC) परिसरात चक्क 70 लाख रुपयांचा भूखंड परस्परच लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे ज्या व्यक्तीच्या बाबतीत हा प्रकार घडला. त्याच्या कुटुंबीयांनाही या घटनेचा पुढची अनेक वर्षे पत्ता नव्हता. नवी मुंबईतील सानपाडा गावात राहणाऱ्या मुलधीर कृष्णा भोईर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. अजय निमगुळकर नावाच्या व्यक्तीने हा धक्कादायक प्रकार घडला.

मुरलीधर कृष्णा भोईर यांचा मृत्यू 1995 मध्ये झाला. त्याच्याच पुढच्या वर्षी 1996 मध्ये अजय निमगुळकर याने मृत भोईर यांच्या नावे भलताच एक बगस व्यक्ती उभा करुन त्याच्या नावे खोट्या आणि बोगस स्वाक्षऱ्या घेतल्या आणि जमीनीचा व्यवहार केला. ही जमीन म्हणजे एमआयडीसीकडून भोइर यांना मिळणारा भूखंड होता. ज्याची किंमत 70 लाख रुपये होती. निमगुळकर याने बळकावलेला भूखंड त्याने स्वत:कडेच ठेवला नाही तर चक्क तो दुसऱ्यांनाही विकला. प्रकरण उघडकीस आल्यानंतर सानपाडा पोलिसांनी अजय निमुळकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, BMC School News: धक्कादायक! मुंबई महापालिका शाळांच्या भाडेतत्वावरील खोल्या अधिकाऱ्यांनी परस्परच विकल्या)

प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबईतील सानपाडा गावातील कृष्णा हासू भोइर यांची बोनसरी येथे असलेली वडिलोपार्जित जमीन एमआयडीसीने 1962 मध्ये संपादित केली होती. या भूसंपादनानंतर कृष्णा भोईर यांना फायझर कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र, एमआयडीसीकडून मिळणारा भूखंड मात्र अद्यापही भोइर यांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना भेटला नव्हता. त्यामुळे भोईर यांचे नातू मनोज यांनी 2008 मध्ये याबाबत एमआयडीसीकडून अधिक माहिती घेतली. या वेळी त्यांना आजोबांनी पीएपी-80 हा भूखंड प्राप्त झाला असून, त्याचे वाटपही झाल्याचे पुढे आले.

भूखंडवाटप झाल्याची माहिती मिळताच भोईर कुटुंबीयांना धक्का बसला. भूखंड वाटप झाला पण आपल्याला अद्यापही तो मिळाला नाही याबाबत त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी अधिक चौकशी केली असता कृष्णा भोइर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेला भूखंड भलत्याच कोणा व्यक्तीला विक्री झाला अथवा मिळाला असल्याचे पुढे आले. दरम्यान, भोईर कुटुंबीयांनी अधिक माहिती घेतली असता कृष्णा भोईर यांच्या नावे भेटलेला भूखंड विकल्याचे पाहायला मिळाले. हा व्यवहार नोव्हेंबर 1996 मध्ये झाल्याचे पुढे आले. हा कुटुंबीयांसाठी दुसरा धक्का होता. कारण मुरलीधर कृष्णा भोईर यांचे निधन 9195 मध्ये झाले होते. मग हा व्यवहार झाला कसा याबाबत उत्सुकता निर्माण झाली.

मुरलीधर भोइर यांच्या नातवाने सानपाडा पोलिसांकड याबाबत तक्रार दिली. दरम्यान, पोलीस तपासात पुढे आले की, मुरलीधर भोइर यांचा मृत्यू 31 ऑगस्ट 1995 रोजी झाला. दरम्यान, नेरुळ येथे राहणाऱ्या अजय निमगुळकर नावाच्या व्यक्तीने नोव्हेंबर 1996 मध्ये कोणा भलत्याच बोगस व्यक्तीला मुरलीधर भोईर नावाने उभे केले आणि त्याने खोट्या सह्या करुन भूखंड परस्परच विक्री केला. विक्री झालेल्या भूखंडाच्या कादगपत्रांनसार भूखंडावरील बांधकामासाठी करण्यात आलेले अर्ज, नकाशे आणि घोषणापत्र सगळंच कसं बोगस असल्याचे पुढे आले आहे. निरगुळकर यांनी रजा इस्माईल हाफीस फोडकर यांना हा भूखंड 70 लाख रुपये किमतीला निमगुळकर याने विकल्याचे पुढे आले आहे. याबाबत सानपाडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.