प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: फाइल फोटो)

Navi Mumbai: नेरुळ पोलिसांनी एका विवाहित दांपत्यांना रेल्वे स्थानकाच्या येथून अटक केली आहे. त्यानुसार या दांपत्यांनी त्यांच्या नवजात मुलींना दोन महिलांना प्रत्येकी 90 हजार रुपयांना 2019 रोजी विक्री केल्या होत्या. या प्रकरणी बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानुसार अनधिकृत पद्धतीने विक्री केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे.(मुंबईत 2021 च्या वर्षात गुन्ह्यात 27 टक्क्यांनी वाढ, चोऱ्या आणि बलात्कारांच्या प्रकरणात पोलिसांकडून केली गेली कारवाई) 

पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, यापूर्वी सुद्धा त्या दांपत्याने त्यांचा नवजात मुलगा विक्री केली किंवा त्याचा दत्तक म्हणून दिले आहे. खरेदी केलेल्यांपैकी 60 वर्षीय आणि 35 वर्षीय महिला या बेलापूर व मानखुर्द येथे राहणाऱ्या आहेत. आरोपींकडून त्यांनी अनधिकृत पद्धतीने मुल दत्तक घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

एपीआय राजेंद्र घेवडेकर यांनी असे म्हटले की, सध्या आरोपी दांपत्यांना त्यांनी त्यांची नवजात मुल विक्री केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. पण खरेदी केलेल्या महिलांना अटक करण्यात आलेली नाही. मात्र त्यांना समन्स धाडले असून कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.(Mumbai: एनसीबीने अंधेरी पूर्वेला महिलांच्या कपड्यांमध्ये लपवण्यात आलेले 3.950 ग्रॅमचे Ephedrine केले जप्त)

घेवडेकर यांनी पुढे असे म्हटले की, बुधवारी आरोपी दांपत्याच्या विरोधात ठाणे जिल्ह्यातील महिला आणि बालकल्याण विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. आरोपी महिलेने तिने ज्या महिलेला बाळाची 90 हजार रुपयांना विक्री केली तिचे नाव सांगितले. तर अन्य चार मुलांना नीट जेवायला घालता येत नसल्याने आणि पैशांची गरज असल्याने बेलापूर येथील एका महिलेला आपले बाळ तिच्या नवऱ्याने विक्री केल्याचे तिने म्हटले.

बेलापूर येथील महिलेने दत्तक घेतेल्या बाळासाठी कागदपत्रे तयार केली होती. पण ती अनधिकृत आहेत. त्यामुळे दत्तक घेतलेल्या महिलांना पोलिसांनी समन्स धाडून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.