मुंबईत 2021 च्या वर्षात गुन्ह्यात 27 टक्क्यांनी वाढ, चोऱ्या आणि बलात्कारांच्या प्रकरणात पोलिसांकडून केली गेली कारवाई
(Archived, edited, symbolic images)

Mumbai:  देशासह मुंबईत कोरोनाच्या परिस्थिमुळे टप्प्याटप्प्यानुसार लॉकडाऊन गेल्या वर्षात लावण्यात आला होता. परंतु या दरम्यान मुंबईत गुन्ह्यांमध्ये 2020 च्या तुलनेत 27 टक्क्यांनी वाढ म्हणजेच तब्बल 64,656 प्रकरणे समोर  आली आहेत. या व्यतिरिक्त दोन बलात्कार आणि दररोज चोऱ्या होण्याचे प्रकार वाढीस लागले होते. अधिक माहिती देत असे सांगण्यात आले आहे की, दिवसाला 12 चोऱ्या आणि 5 घरफोड्या झाल्या.(Maharashtra Army Paper Leaked: लष्कर विभागातील व्हेईकल मेकॅनिक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी BRO चे महासंचालक राजेशकुमार ठाकूर यांना अटक) 

गेल्या दोन वर्षात 50 टक्के म्हणजेच 1,15,724 एफआयआर पोलिसात दाखल करण्यात आले. महिला आणि मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये 20 टक्के (6038) तर चोऱ्यांच्या घटनांमध्ये 32 टक्क्यांनी वाढ (4534) गेल्या वर्षात झाली आहे. सायबर फसवणूकीच्या प्रकरणात 18 टक्के (2883)  किंवा दररोज आठ प्रकरणे या संबंधित समोर आली आहेत. (Fraud: ऑनलाइन सट्टेबाजीसाठी बँकेतील पैसा वापरल्याप्रकरणी खासगी बँकेच्या उपशाखा व्यवस्थापकाला माटुंगा पोलिसांकडून अटक)

गुन्ह्याच्या प्रकरणात वाढ झाल्याने तक्रारी अधिक वाढल्या गेल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तर लॉकडाऊनच्या दरम्यान सर्व काही बंद असल्याने नागरिक घरात अडकून पडले होते. त्यामुळे ते ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करायचे. याच दरम्यान त्यांची सुद्धा फसवणूक होत सायबर गुन्ह्यांची प्रकरणे आणि लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटना ही वाढल्या गेल्या.