Representational Image (Photo Credit: ANI)

Maharashtra Army Paper Leaked: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीची प्रकरणे समोर आली आहेत. अशातच आता लष्कर विभागाच्या व्हेईकल मेकॅनिक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात BRO चे महासंचालक राजेशकुमार ठाकूर यांना अटक करण्यात आली आहे. तर 31 ऑक्टोंबर 2021 रोजी भरती झाली. परंतु त्यावेळी जवळजवळ 40 जणांना त्यासंदर्भात पेपर दिल्याचे उघड झाले आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.(Goa Assembly Polls 2022: आदित्य ठाकरे गोव्यात प्रचारासाठी उतरणार, शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर; उत्पल पर्रिकर यांच्यासाठी उमेदवारी मागे घेण्याची संजय राऊत यांची घोषणा)

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी असे म्हटले की, राजेशकुमार ठाकूर हे स्वत: पेपर सेट करायचे आणि त्यांनी ते फोडले आहेत. पेपरफुटीसाठी ठाकूर यांनी 25 लाखांची मागणी केली होती. जीआरएफ विभागाच्या स्टोअर किपर टेक्निकल आणि मल्टी स्किल वर्कर ड्रायव्हर परीक्षेचा पेपर होता. हा पेपर मार्च महिन्यात तयार करण्यात आल्यानंतर पुढील महिन्याच्या अखेरच्या दिवशी तो फुटला.

या प्रकरणी सुरुवातीला असे समोर आले होते की, 36 जणांना पेपर दिला गेला होता. मात्र नंतर अधिकाधिक तपास केल्यानंतर साठ जणांपर्यंत पेपर पोहचल्याचे समोर आले. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला आर्मी अॅन्टिलिजेस ब्युरोकडून सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांची अधिक चौकशी केली असता ठाकूर यांचे नाव समोर आले. त्यावेळी ठाकूर हे दीघ्यातील लष्कर विभागात कार्यरत होते.(कचऱ्याच्या होणाऱ्या आजारापासून लांब ठेवण्यासाठी BMC चे नागरिकांना आवाहन)

ठाकूर यांनी विमानतळावर 9 लाखांची रोकड स्विकारली आणि मुलाच्या खात्यात पाच लाख रुपये पाठवले. त्यांचा मुलगा हा अमेरिकेतील हवॉर्ड युनिव्हर्सिटी येथे शिकत आहे. परंतु मुलाचा या प्रकरणी संबंध नसल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.