नवी मुंबईत इमारतीला भीषण आग (Photo Credits-ANI)

मुंबईत दिवसेंदिवस आग लागण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढत चालले आहेत. त्यात आता पुन्हा भर पडली असून नवी मुंबईतील हाय राईस अपार्टमेंटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हाय राईस अपार्टमेंट ही नेरुळ सीवूड सेक्टर 44 येथे स्थित असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.तसेच इमारतीच्या वरील बाजूस ही भीषण आग लागली असून मोठे धुराचे लोट बाहेर पडत आहेत.या आगीमुळे सध्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच स्थानिक लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र आग लागल्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. तसेच अद्याप कोणतीही जीवतहानी किंवा  कोणी गंभीर झाल्याची पुष्टी सुद्धा करण्यात आली नाही आहे.

शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील आग मिलन इंटस्ट्री  येथील लेदर वर्कशॉपला लागल्याची घटना घडली. त्यावेळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी जवळजवळ तासभर लागला पण कोणतीही जिवतहानी झाली नाही. (कांदिवली: कापड गोदामाला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू)

Tweet:

तर काही दिवसांपूर्वी मलबार हिल येथे एका निवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी या दुर्घटनेत अडकलेल्या 17-18 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तसेच नव्या वर्षाच्या सुरुवातीला कुर्ला पश्चिम परिसरात स्थित असलेल्या मेहता इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. मात्र या प्रकरणी कोणतीही जिवतहानी झाली नाही.