नवी मुंबई: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मोटार ट्रान्सपोर्ट उपमहानिरिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल
Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: Newsplate)

नवी मुंबई (Navi Mumbai) येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि अत्याचार केल्याच्या आरोपाखाली मोटार ट्रान्सपोर्ट उपमहानिरिक्षक निशिकांत मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील तळोजा येथे राहणाऱ्या एका परिवारातील सदस्यांनी अल्पवयीन मुलीसोबत वाईट कृत्य केल्याचा आरोप लगावला आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडिया यांनी अधिक माहिती दिली आहे. या प्रकरणी अभिनेत्री डॉली बिंद्रा हिच्यासह पंजाबी समाजातील सदस्यांनी एकत्र येऊन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, निशिकांत मोरे यांच्यासोबत त्यांची काही वर्षांपूर्वी मैत्री झाली. तर मुलीच्या 17 व्या वाढदिवासाच्या दिवसानिमित्त निशिकांत घरी आले होते. केक कापल्यानंतर त्यांनी तो मुलीच्या तोंडाला लावत एका विचित्र पद्धतीने तिच्या गालाला आणि अन्य ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा व्हिडिओ पोलिसांकडे देण्यात आला आहे.(पुणे: वसंत बार परिसरात बाऊन्सरचा हवेत गोळीबार; 13 जणांवर गुन्हा दाखल)

ANI Tweet:

त्याचसोबत मुलीच्या वडिलांनी असा ही आरोप केला आहे की, निशिकांत आणि त्याच्यासोबतचा एक पोलीस मुलगी खारघर येते शिकवणीसाठी जाते ते सुद्धा त्यांना पाहिले होते. मुलीने त्या दोघांना पाहताचा घाबरली आणि अपहरण करतील याची भीती तिला वाटू लागली. या प्रकरणी आम्ही घटनास्थळी पोहोचताच एक पोलिस पळून गेला. परंतु या प्रकरणातही पोलिसांनी कोणतीही एफआयआर दाखल केली नाही, असे टाईम्स ऑफ इंडियाने सांगितले आहे. दरम्यान, झोनल डीसीपी अशोक दुधे यांनी सांगितले की आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत आणि मुलीच्या वडिलांनी सादर केलेला व्हिडिओ पाहिला आहे.