Firing | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) परिसरातील एका बारमध्ये चक्क बाऊन्सरने हवेत गोळीबार केला आहे. वसंत बार (Vasant Bar) परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी ग्राहक, बाऊन्सर (Bouncer) आणि इतर 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ज्या 13 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तो बाऊन्सर, ग्राहक आणि इतर लोकांची नावे अद्याप समोर आली नाहीत. मात्र, गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला असून, लवकच हे लोक कोण आहेत त्यांबाबत माहिती मिळू शकेल, असे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे.

प्राप्त माहितीनुसार, वसंत बार येथे काही ग्राहक दाखल झाले. त्यांनी काही ऑर्डर केली. मात्र, बील देण्याच विषय आला तेव्हा हे लोक नकार देऊ लागले आणि वाद घालू लागले. थोड्याच वेळात या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. त्यानंतर बारच्या बाऊन्सरने हवेत गोळीबार केला. (हेही वाचा, पुणे येथे Massage Centre मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आरोपीला अटक)

घडल्या प्रकारामुळे परिसरात एक खळबळ उडाली. ज्या बारमध्ये ही घटना घडली तो बार एका नगरसेवकाच्या मालकिचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, ज्या बाऊन्सरने गोळीबार केला त्याच्याकडे बंदूक कोठून आली. त्याच्याकडे बंदूक वापरण्याचा परवाना होता काय? यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.